रश्मिका मंदानाचा अपघात!

बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री रश्मिका मंदानाचा नुकताच एक किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर बरे होण्यासाठी ती डॉक्टरांच्या सल्ल्याने बराच काळ घरीच होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 11 Sep 2024
  • 06:37 pm

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) नुकताच एक किरकोळ अपघात (Accident) झाला. अपघातानंतर बरे होण्यासाठी ती डॉक्टरांच्या सल्ल्याने बराच काळ घरीच होती.

आता रश्मिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या आरोग्याचे अपडेट दिले आहे. अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने याबाबत पोस्ट केली आहे. ‘‘मला माहीत आहे की मी येथे उपस्थिती दर्शवून बराच काळ लोटला आहे. बराच काळ सक्रिय न राहण्याचे कारण म्हणजे माझा अपघात.  अर्थात तो किरकोळ अपघात होता. माझी रिकव्हरी चालू होती आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घरी विश्रांती घेत होते. त्यामुळे तुमच्या संपर्कात राहू शकले नाही.’’

आता मी बरी आहे. तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन नेहमी स्वतःला प्राधान्य द्या. कारण आयुष्य खूप नाजूक आणि लहान आहे आणि आपल्याला माहित नाही की आपण उद्या तिथे आहोत की नाही. म्हणून दररोज आनंद निवडा. आणखी एक अपडेट म्हणजे मी खूप लाडू खात आहे, असेही रश्मिकाने सांगितले.

रश्मिकाचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट २०२३चा ब्लॉकबस्टर हिट ‘ॲनिमल’ होता. लवकरच ती सहा मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या ती २०२१ मध्ये आलेल्या ‘पुष्पा : द राइज’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिच्याकडे हिंदी भाषेतील ‘छावा’ आणि ‘सिकंदर’ हे दोन मोठे चित्रपट आहेत. ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’मध्ये रश्मिका आणि सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे.

यंदा ६ डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘छावा’ या ऐतिहासिक नाटक चित्रपटात रश्मिका आणि विकी कौशल ही जोडी दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, त्याचे खूप कौतुक होत आहे. ‘सिकंदर’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रश्मिका  ही ‘द गर्लफ्रेंड,’ ‘रॅम्बो’ आणि ‘कुबेरा’ या तेलुगू चित्रपटांचादेखील भाग आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story