दोन वर्षांनंतर कंगनाने सुरू केला 'वर्कआऊट'
अभिनेत्री कंगना रणोतने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर वर्कआउटचा व्हीडीओ शेअर केला आहे. व्हीडीओमध्ये ती जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. यावेळी ती 'ब्लॅक स्पोर्टी लूक' मध्ये दिसत आहे. या व्हीडीओद्वारे कंगनाने सांगितले की, तिने दोन वर्षांपासून वर्कआउट केलेले नाही.
व्हीडीओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'श्रीमती गांधींची भूमिका साकारण्यासाठी मी वर्कआउटमधून दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. मात्र, आता मी माझ्या फिटनेस रुटिनमध्ये परतले आहे, एका अॅक्शन चित्रपटासाठी मला माझ्यात आश्चर्यकारक बदल घडवायचा आहे. त्याची तयारी मी करत आहे.'
अभिनय आणि दिग्दर्शनानंतर कंगना आता निर्मातीदेखील झाली आहे. अलीकडेच कंगनाने तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनवलेल्या 'टिकू वेड्स शेरू' या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट २३ जून रोजी प्राइम व्हीडीओवर प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे.
कंगना लवकरच 'चंद्रमुखी २' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती राजाच्या दरबारातील नर्तिकेची भूमिका साकारणार आहे, जी तिच्या सौंदर्यासाठी आणि नृत्यकौशल्यासाठी प्रसिद्ध होती. याशिवाय कंगना ‘इमर्जन्सी’ मध्येही दिसणार आहे. त्याचे दिग्दर्शनही कंगनानेच केले आहे. कंगनाच्या हातात 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'द अवतार: सीता' हे चित्रपटदेखील आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.