कंगनाला आवडला विद्युत
बॉलीवूडमध्ये आता कुणी असा सेलिब्रेटी राहिला असेल ज्याच्यावर कंगना बोलली नसेल, तिनं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते रणवीर सिंह यांच्यापर्यत अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत घेतलेल्या वादामुळे तिला कोर्टापर्यत जावे लागले होते. अशातच कंगनावर नेटकऱ्यांकडून मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.
आता कंगनाने एका बॉलीवूड अभिनेत्याचे कौतूक केले आहे. त्याच्यासोबत आपल्याला काम करायला आवडेल असे सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे. त्याचे कारण फार कमी वेळा असे होते की, कंगना कुणाचे कौतूक करते आहे. कंगनाने ज्या अभिनेत्याचे नाव घेतले आहे तो अभिनेता दुसरा कुणी नाही तर विद्यूत जामवाल आहे. कंगनाने त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी कंगनाने त्याच्या काही चित्रपटांचा संदर्भही दिला आहे. कंगनानं तिच्या धाकड फिल्ममध्ये पहिल्यांदा अॅक्शन अभिनेत्री म्हणून काम केले होते. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता कंगनाला विद्युत जामवाल सोबत काम करायचे आहे. आगामी काळात त्याच्यासोबत एक फिल्म करायची असल्याचा इरादा कंगनाने बोलून दाखवला आहे. कंगनाला असे वाटते की, तिला कुणी एखाद्या अॅक्शन फिल्ममध्ये कास्ट करावे. त्यात तिची आणि विद्युत जामवालची जोडी चांगली वाटेल. कंगनालाही विद्युत आवडतो. यासाठी तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीतील एक व्हीडीओ पुन्हा शेयर केला आहे. ज्यात ती विद्युत सोबत रँप वॉक करताना दिसत आहे. तो व्हीडीओ शेयर करताना कंगनाने लिहिले आहे की, कशी आहे आमची जोडी, कुणी आम्हाला अॅक्शन फिल्ममध्ये घेईल का? त्या व्हीडीओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.