सोशल मीडियापासून काजोलने घेतला 'ब्रेक'
सोशल मीडियावर सतत व्हीडीओ, फोटो, पोस्ट शेअर करणे कलाकारांना आवडते. काही कलाकार मंडळी, तर आपल्या खासगी आयुष्याबाबतही सोशल मीडियाद्वारे खुलेपणाने बोलताना दिसतात, पण अलीकडे सोशल मीडियापासून काही काळ 'ब्रेक' घेणे हा नवा 'ट्रेंड' कलाकारांमध्ये सुरू झाला आहे. आता काजोलनेही सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचे सांगितले आहे, पण यामागचे कारण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियापासून ब्रेक का घेत आहे हे तिने पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितलं. तिच्या या पोस्टनंतर चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत.
तिने एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये काजोलने म्हटले आहे की, “मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळामधून सध्या जात आहे”. या फोटोला तिने एक कॅप्शन दिले आहे. “मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे” असे ते कॅप्शन आहे, पण काजोलच्या आयुष्यामध्ये नेमके काय घडले? हे तिने सांगणे टाळले आहे. इतकेच नव्हे, तर काजोलने तिच्या इतर सगळ्या इन्स्टाग्राम पोस्ट डीलिट केल्या आहेत. तिच्या या निर्णयानंतर चाहतेही चिंता व्यक्त करत आहेत. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून काजोलला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तू तुझी काळजी घे, तसेच तुला पाहिजे तेवढा वेळ स्वतःसाठी खर्च कर, काजोल नक्की काय झालं? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.