सुशांतच्या आठवणीत...
बॉलिवूडचा लोकप्रिय, हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूत या जगातून जाऊन बुधवारी तीन वर्षे झाली. आजच्या दिवशी, म्हणजे १४ जून २०२० रोजी सुशांत मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या अनपेक्षित निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. सुशांतच्या आठवणीत अडकलेले त्याचे चाहते पुन्हा त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यासोबतच सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्ती आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांनी देखील सुशांतच्या आठवणीच्या पोस्ट शेयर केल्या आहेत.सुशांतच्या स्मरणार्थ त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर त्याचे काही फोटो शेअर करत एक भावनिक नोट लिहिली. बरोबर स्क्रीनशॉट आहेत. त्यात सुशांत त्याच्या आवडत्या पुस्तकांचे नाव सांगत आहे आणि चांगल्या पुस्तकांबाबत सल्लाही विचारत आहे.
कॅप्शनमध्ये श्वेता सिंह कीर्ती म्हणते की, लव्ह यू, ब्रदर , तुझ्या बुद्धिमत्तेला सलाम. मला प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. मला माहित आहे की तू आता माझा एक भाग आहेस... तू माझ्या श्वासाचा अविभाज्य भाग झाला आहेस. सुचवलेली काही पुस्तके शेअर करत किर्ती म्हणते आपण तेच होऊ या. #SushantIsAlive." यासोबतच तिने एक व्हीडीओ देखील शेयर केला आहे. सुशांतच्या चाहत्यांना उद्देशून श्वेता पुढे म्हणते की, जर आपल्याला सुशांतला जिवंत ठेवायचे असेल आणि आपले त्याच्यावर खरोखर प्रेम असेल, तर तो जे होता ते आपण केले पाहिजे. त्यांची गुणवत्ता आपल्यात आणावी लागले आहे. त्याच्या मनातील चांगुलपणाचा स्वीकार करावा लागले. मी माझ्या धाकट्या भावासाठी प्रार्थना करत आहे.याबरोबर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि बॉलिवूड अभिनेत्री हिनेही सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने सुशांतबरोबरचा एक छोटा व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओत रिया आणि सुशांत लडाखच्या टेकड्यांमध्ये हिंडताना दिसत आहे. रियाने सुशांतला मागून मिठी मारली असून दोघेही खूप आनंदात असल्याचे दिसते. सुशांतचे चाहते या पोस्टवर कमेंट करत असून काहींनी त्याच्यावर टीका केली आहे........
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.