इम्तियाजला वाटते ‘बिग बीं’ची भीती

दिग्दर्शक इम्तियाज अलीने नुकताच खुलासा केला आहे की, तो अमिताभ बच्चनसोबत काम करताना घाबरतो. ‘रॉकस्टार’ पाहिल्यानंतर बिग बींनी पत्र लिहून चित्रपटाचे कौतुक केल्याचेही त्याने सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 21 Aug 2024
  • 11:39 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दिग्दर्शक इम्तियाज अलीने नुकताच खुलासा केला आहे की, तो अमिताभ बच्चनसोबत काम करताना घाबरतो. ‘रॉकस्टार’ पाहिल्यानंतर बिग बींनी पत्र लिहून चित्रपटाचे कौतुक केल्याचेही त्याने सांगितले.

एका मुलाखतीत इम्तियाज अलीने सांगितले की, तो अमिताभ बच्चनसोबत काम करताना घाबरतो. बिग बी हे मेगास्टार म्हणून खूप मोठे आहेत आणि त्यांची तुलना शाहरुख खानच्या स्टारडमशी केली. तो म्हणाला की शाहरुख त्याच्यासाठी इतका मोठा नाही कारण तो बिग बींपेक्षा लहान आहे.

इम्तियाजने पुढे बिग बींच्या स्टारडमचा एक किस्सा शेअर केला. तो म्हणाला, ‘‘मी छोट्या ठिकाणाहून आलो आहे. मी त्यांचे (बिग बी) स्टारडम पाहिले आहे. १९८५ मध्ये आलेल्या ‘गिरफ्तार’ या चित्रपटातील एक दृश्य पाहून थिएटरमधील लोक वेडे झाले होते. लोकांनी सभागृहाच्या खुर्च्या तोडल्या होत्या.

याच मुलाखतीत इम्तियाज अलीने असेही सांगितले की, ‘रॉकस्टार’ रिलीज झाल्यानंतर त्यांना बिग बींचे पत्र आले होते. त्या पत्रात बिग बींनी रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी स्टारर ‘रॉकस्टार’ चित्रपटाचे कौतुक केले होते.

 इम्तियाज आणि अमिताभ बच्चन यांनी अद्याप कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. या दोघांनीही एका टीव्ही जाहिरातीत एकत्र काम केले होते. दिग्दर्शकाने २०१७ मध्ये इंस्टाग्रामवर बिग बींसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये दोघेही मिठी मारताना दिसतात. इम्तियाजने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘‘मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते तेव्हा आई म्हणाली होती, आता तू डायरेक्टर झाला आहेस.’’

इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘रॉकस्टार’ हा चित्रपट रणबीरसाठी गेम चेंजर ठरला. रणबीरच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम चित्रपट मानला जातो.  या चित्रपटात रणबीरसोबत नर्गिस फाखरीही मुख्य भूमिकेत होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story