हॅपी बर्थ डे, न्यासा !
बॉलिवूडच्या स्टार किडमध्ये सर्वाधिक फॉलोअर असलेली आणि सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय असलेली न्यासा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. जेव्हा ती मुंबईबाहेर जाण्यासाठी पाऊल टाकते त्यावेळी तिचे फोटो, व्हीडीओ क्षणात व्हायरल होत असतात. अनेक वेळा बॉलिवूडमधील आपल्या मित्रांसमवेत पार्टी करताना न्यासा आढळलेली आहे. न्यासाने गुरुवारी २० वर्षात पदापर्ण केले आणि तिच्यावर फॉलोअर आणि चाहत्याच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. पप्पा अजय देवगण आणि मम्मा काजोल यांनीही तिला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांनी दिलेल्या शुभेच्छांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती.
अजय आणि काजोलने न्यासाला शुभेच्छा देताना एकत्रित फोटो टाकलेले आहेत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनावेळी न्यासा आणि काजोलने एकत्र हजेरी लावलेली होती. या कार्यक्रमातील एक फोटो काजोलने सोशल मीडियावर टाकला आहे. पिंक कार्पेटवरील त्या दोघींच्या हजेरीने कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. काजोलने यावेळी नक्षीदार पारंपरिक वेष परिधान केला होता. या वेळी चंदेरी रंगाचा गाऊन घातलेल्या न्यासाने साऱ्यांना नजरा रोखून धरावयास लावल्या होत्या. दोघीही सुहास्य वदनाने फोटोग्राफरना पोज देताना दिसत आहेत. या फोटोबरोबर काजोलने न्यासाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या शुभेच्छांमध्ये काजोल म्हणते, आम्ही दोघी अशा आहोत आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही अशाच राहणार आहोत. आम्हा दोघींतील प्रेमाचा महासागर कधीच आटणार नाही. महासागराच्या खोलीचा जसा अंत लागत नाही तसे आम्हा दोघींमधील प्रेम ही अनंत क्षणापर्यंत असेच अथांग राहणार आहे. न्यासा, तू अशीच हसत राहा आणि तुझ्या चेहऱ्यावरील हास्याला कधीही, केव्हाही काळी किनार लागू नये हीच इच्छा. २० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
दुसऱ्या बाजूला अजय देवगणने कन्या न्यासासमवेतचे काही कोलाज केलेले सेल्फी फोटो शेअर केले आहेत. या फोटोत न्यासाने स्ट्रीप टॉप वापरलेला आहे तर अजय देवगण काळ्या सूटमध्ये दिसून येतोय. बाप-लेकीचा एकत्रित फोटो अतिशय सुंदर दिसत आहे. अजय फोटोला कॅप्शन देताना म्हणतो, फादर ऑफ माय प्राईड. हॅपी बर्थ डे बेबी!
या फोटोनंतर चाहत्यांनीही न्यासावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.अजय देवगणचा भोला हा नुकताच प्रदर्शित झाला असून येऊ घातलेल्या मैदान या चित्रपटात तो दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम मालिकेतील आगामी चित्रपटात तो दीपिका पदुकोनबरोबर हाणामारी करताना आणि गाड्या उडवताना दिसेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.