वयाच्या अंतरावरून तमन्ना-रजनीकांत ट्रोल
तमन्ना भाटिया लवकरच रजनीकांतसोबत जेलर या चित्रपटात झळकणार आहे. अलीकडेच तमन्नाला तिच्या आणि चित्रपटातील तिच्या सहकलाकाराच्या वयातील अंतराबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ३३ वर्षीय तमन्नाने ७२ वर्षीय रजनीकांत यांच्यासोबत या चित्रपटात काम केले आहे. दोघांच्या वयात ३९ वर्षांचे अंतर आहे.
वयाच्या या अंतरावर तमन्ना म्हणाली की, 'ती वयाच्या ६० व्या वर्षीही डान्स करायला तयार असेल. जसे टॉम क्रूझ वयाच्या ६० व्या वर्षीही स्वतःचे स्टंट स्वत:च करतो. जेलर चित्रपटातील तू आ दिलबरा या गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमादरम्यान तिने हे वक्तव्य केले. ती पुढे म्हणाली की, 'तुम्ही वयाच्या अंतरांसारख्या गोष्टीकडे का लक्ष देत आहात? तुम्ही फक्त स्क्रीनवर दिसणार्या पात्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'
चित्रपटात तमन्ना भाटिया सुपरस्टार रजनीकांतसोबत कवला गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रजनीकांत आणि तमन्ना एकत्र गाण्याची हुक स्टेप करत आहेत. हे गाणे शिल्पा राव आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी गायले आहे. अनुराज कामराज यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. हा चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार आहेत. चित्रपटात रजनीकांत एका जेलरच्या भूमिकेत आहे जो एका मिशनवर आहे. चित्रपटात कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार, रामय्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी आणि विनायकन दिसणार आहेत. मल्याळम सुपरस्टार मोहनलालदेखील या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहेत. यासोबतच बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफही या चित्रपटात दिसणार आहे. जेलरनंतर तमन्ना ६७ वर्षीय चिरंजीवीसोबत भोला शंकर चित्रपटात दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.