वडिलांशी वैर!
बॉलिवूडवर एकेकाळी राज्य करणारी अभिनेत्री अमिषा पटेल आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाशिवायच्या कारणांमुळेच जास्त चर्चेत असलेल्या अमिषासाठी चाहते वेडे होत होते. हृतिक रोशन आणि अमिषा 'कहो ना प्यार है...' रिलीज झाला आणि दोघेही रातोरात स्टार झाले. अमिषा सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी ती अजूनही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे ती लवकरच 'गदर-२' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकेकाळी अमिषाने आपल्या वडिलांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामळे तिचे चाहतेही अमिषावर नाराज झाले होते. अमिषा केवळ अभिनयातच नव्हे तर अभ्यासात प्रचंड हुशार होती. तिनं अर्थशास्त्रामध्ये सुवर्णपदक मिळवले होते. अत्यंत प्रामाणिक आणि सरळ मार्गी व्यक्ती म्हणून तिची ओळख होती. असे असूनही आयुष्यात अनेक वेळा तिला टीकेला सामोरे जावे लागले. अनेकदा तिच्या खासगी आयुष्यातील घटनांमुळे ती चर्चेत असते.
'कहो ना प्यार है' शिवाय 'गदर', 'रेस' असे काही मोजके सिनेमे वगळले तर तिला फारसे चांगले यश मिळाले नाही. प्रेक्षकांमध्येही तिच्याविषयी नाराजी निर्माण झाली. याचे कारण म्हणजे ती स्वतःच्या वडिलांविरोधात न्यायालयात गेली होती. अमिषाने वडिलांवरच कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. अमिषाने तिच्या वडिलांवर १२ कोटीचा अफरातफरीचा आरोप करत वडिलांनाच कोर्टात खेचले होते. ही गोष्ट तिच्या चाहत्यांना काही आवडली नाही. या प्रकरणाने तिच्या कारकिर्दीवरही परिणाम होत गेला. या प्रकरणापासून अमिषा आई-वडिलांपासून दूर राहते. अशा या अमिषाला वाढदिवसांच्या शुभेच्छा.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.