दिलजीत-स्विफ्टचे अफेअर?
प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांज हा त्याच्या आगळ्या गायन शैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची गायन शैली ही त्याची ओळख आहे. तसेच बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत हिच्याबरोबरच्या वादामुळेही दिलजीत चर्चेत आला होता. हा वाद स्मरणातून जात नसताना आता दिलजीत हा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. केवळ गायकीच नाही तर अभिनयासाठीही दिलजीत ओळखला जातो. काही चित्रपटांमधून दिलजीतनं आपण चांगल्या प्रकारे अभिनय देखील करू शकतो हे दाखवून दिले आहे. जगभर आपल्या वेगळ्या धाटणीच्या गायकीमुळे प्रसिद्ध झालेला दिलजीत हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता चर्चेत येण्यासाठी व्यावसायिक कारण नव्हे तर व्यक्तिगत आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्याचं नाव आता अमेरिकेची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टशी जोडले जात आहे.
टेलर स्विफ्टशी नाव जोडले गेल्याने दिलजीतलाही मोठा धक्काच बसला आहे. त्याने त्यावर दिलेली प्रतिक्रियाही भलतीच भन्नाट आहे. एका वृत्तवाहिनीने बातमी देताना असे म्हटले आहे की, कॅक्टस क्लब कोल हार्बरमध्ये टेलर स्विफ्ट आणि दिलजीत दोसांज यांना एकत्रित पाहिले गेले. या माहितीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.
या सगळ्या प्रकरणावर दिलजीत प्रतिक्रिया देताना म्हणातो की, अरे यार, खासगी आयुष्य नावाची काही गोष्ट आहे की नाही. तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याचा परिणाम आयुष्यावर होतो हे लक्षात ठेवा. मला माहिती होते की, मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं ट्विट केलं तरी त्याचा निराळाच अर्थ लावून नेटकरी रिकामे होणार. त्यामुळे मला त्यांना सांगायचे आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कल्पना आहे की, काही दिवसांपासून माझ्या आणि टेलर स्विफ्ट विषयी वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ते ट्विट मी आता डिलिट केले आहे. यापूर्वी देखील दिलजीत हा हटके स्टाईलमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव राहणाऱ्या दिलजीतचा जगभर चाहतावर्ग मोठा आहे. त्याला
इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.