डीडीएलजे हिट होईल असे वाटले नव्हते

बॉलीवूडमधील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट कुठला असा प्रश्न विचारला तर येणाऱ्या उत्तरांमध्ये हमखास 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाचे नाव घेतले जाते. नुकतेच काजोलने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाच्या निर्मात्यांनाही तो इतका हिट होईल हे माहित नसेल.

'Dilwale Dulhania Le Jayenge,Kajol ,interview ,Bollywood,hit

File Photo

बॉलीवूडमधील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट कुठला असा प्रश्न विचारला तर येणाऱ्या उत्तरांमध्ये हमखास 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाचे नाव घेतले जाते. नुकतेच काजोलने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाच्या निर्मात्यांनाही तो इतका हिट होईल हे माहित नसेल. या चित्रपटाचे यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे चाहते होय. ज्यांनी या कलाकृतीला भरभरून प्रेम दिले. हा चित्रपट दरवर्षी स्वतःचेच विक्रम मोडत राहील.

पीटीआयशी बोलताना काजोल म्हणाली, 'हा चित्रपट जगातील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट आहे. हा चित्रपट दरवर्षी स्वतःचेच रेकॉर्ड तोडतो. पण माझा विश्वास आहे की 'डीडीएलजे' आणि 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या चित्रपटांची खासियत ही आहे की जेव्हा तुम्ही ते पाहता तेव्हा ते अगदी खरे वाटतात.

या चित्रपटाने मुंबई के मराठा मंदिरामध्ये एकूण सातशे आठवडे प्रदर्शनाचे रेकॉर्ड केले होते. या अगोदर हे रेकॉर्ड शोले चित्रपटाच्या नावावर होते. एकाच चित्रपटगृहामध्ये जवळचवळ हा चित्रपट साडेपाच वर्ष प्रदर्शित केला जात होता. आजही हा चित्रपट  मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात दाखवला जात होता.

काजोल म्हणाली, 'मला या चित्रपटांच्या कथा खूप आवडली. जेव्हा तुम्ही एखादे पात्र साकारता तेव्हा तुम्हाला ते आवडते. मला 'डीडीएलजे'ची कथा खूप आवडली. या चित्रपटात मी पूर्णपणे गुंतले होते. मोठी गोष्ट म्हणजे हा चित्रपट आम्ही बनवत होतो तेव्हा आम्हाला वाटले नव्हते की हा चित्रपट इतका हिट होईल.

काजोल म्हणाली, लोकांना 'डीडीएलजे' चित्रपट खूप आवडला. आजही लोक हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतात. मला एक व्यक्ती भेटल्याचे आठवते. त्याने मला सांगितले की मैत्रिणीला प्रपोज करण्यापूर्वी मी 'डीडीएलजे' जवळपास २७ वेळा पाहिला होता. आता त्यांची मुलेही हा चित्रपट एकत्र बघतात.

काजोल म्हणाली, 'या चित्रपटाच्या यशामागे मी किंवा 'डीडीएलजे'ची टीम नाही. उलट हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहणारे चाहते आहेत.

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला होता. आजही हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात दाखवला जातो. २० ऑक्टोबर २०२४ रोजी त्याचे २९ वे वर्ष साजरे होणार आहे. 'डीडीएलजे'चे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते. तर यश चोप्रा यांनी त्याची निर्मिती केली आहे. feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story