अभिनयात अव्वल असतानाही 'या' अभिनेत्याने कधीकाळी ढाब्यावर केली धुणीभांडी

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करण्याची अनेकांची इच्छा असते. पण सर्वांची ही इच्छा पूर्ण होत नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 24 Sep 2024
  • 04:55 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करण्याची अनेकांची इच्छा असते. पण सर्वांची ही इच्छा पूर्ण होत नाही. पण बॉलिवूडमधील असा एक अभिनेता आहे, ज्याला प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी तर मिळाली. पण अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. अभिनयात अव्वल असतानाही ऋषिकेश येथे जावून एका ढाब्यावर धुणीभांडी करण्याची वेळ आली.  

या अभिनेत्याने वयाच्या ३० व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण २४ वर्षांनंतरही महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या अभिनेत्याने इंडस्ट्रीपासून नाते संपवण्याचाही निर्णय घेतला होता. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते संजय मिश्रा आहेत. १९६३ मध्ये बिहारमधील दरभंगा येथे जन्मलेल्या संजय मिश्रा यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेऊन अभिनयाची आवड जोपासली. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातीची वर्षे सोपी नव्हती कारण त्यांनी जाहिराती आणि टेलिव्हिजनमध्ये छोट्या भूमिका केल्या.

छोट-छोट्या भूमिका करत असताना १९९५ च्या सुरुवातीला संजय मिश्रा यांना अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘ओह डार्लिंग! ये है इंडिया' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या  सिनेमात भूमिका बजावल्यानंतर संजय यांनी मागे वळून पाहिलेले नाही. ‘सत्या’ आणि ‘दिल से’ यांसारख्या सिनेमांतही भूमिका बजावली. पण तरी देखील संजय मिश्रा प्रसिद्धी झोतात आले नाहीत. संजय मिश्रा यांनी ‘गोलमाल’, ‘बंटी और बबली’ आणि ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारली आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्क केले.  यशाची पायरी चढत असताना अभिनेत्याच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संजय मिश्रा यांच्या वडिलांचे निधन झाले. अशात निराश झालेल्या संजय मिश्रा यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर संजय मिश्रा यांनी ऋषिकेश याठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. ऋषिकेश याठिकाणी संजय एका ढाब्यामध्ये धुणीभांडी करु लागले. ज्यासाठी त्यांना फक्त १५० रुपये मिळायचे. दरम्यान, ‘गोलमान’ सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी मोठा खुलासा केला आहे. मिश्रा म्हणाले की, ‘मन:शांतीसाठी यामध्ये साधेपणा शोधण्याचा प्रयत्न केला… त्यानंतर काही दिवसांत मुंबईत परतलो. मुंबईत परतल्यानंतर संजय मिश्रा यांनी पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केले. आज संजय मिश्रा यांना कोणत्या ओळखीची गरज नाही. त्यांच्या चाहत्यांची संख्या आज फार मोठी आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story