तमन्नाची कबुली!
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या अनेक दिवसांपासून गाजत आहेत. आता एका कार्यक्रमात तमन्नाने कबूल केले आहे की विजयशी केवळ मैत्री नसून त्यापेक्षाही अधिक काही तरी त्याच्यांत हे. तमन्ना म्हणते की, विजयसोबत माझे घट्ट नाते आहे. मी त्यांची काळजी घेते, तो आजूबाजूला असतो तेव्हा छान वाटते. भारतासारख्या देशात स्त्रीला तिच्या जोडीदारासाठी आपल्या आयुष्यात बरेच बदल करावे लागतात. तथापि, विजय ही अशी व्यक्ती आहे ज्याच्या आगमनाने मला काहीही बदलण्याची आवश्यकता नाही. तो माझी प्रत्येक गोष्ट प्रत्येक छान प्रकारे समजून घेतो.
तमन्ना पुढे म्हणते की, तो सहकलाकार आहे, म्हणून मी त्याच्याकडे आकर्षित झाले असे मला वाटत नाही. मी माझ्या कारकिर्दीत अनेक लोकांसोबत काम केले आहे. त्यामुळे विजयविषयी वाटते ती वैयक्तिक भावना आहे. आमच्या दोघांमध्ये जे काही नाते निर्माण झाले त्याचे वाईट वाटत नाही. आमच्यात परस्पराविषयी चांगली भावना आणि सामजंस्य आहे, त्याचा विचार करता आमच्यातील संबंध वेगळे असल्याचे स्पष्ट होते. विजय आणि तमन्ना यांची भेट लस्ट स्टोरी २ या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान झाली होती. तेथून दोघांमधील जवळीक वाढली.
तुम्ही लस्ट स्टोरीज २ च्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले का? या प्रश्नावर तमन्ना म्हणते की, होय, हे खरे आहे. विजय अशी व्यक्ती आहे, जिच्याशी माझे अगदी नैसर्गिक नाते आहे. त्याच्या उपस्थितीने मला सुरक्षित वाटते. ज्या महिलांनी आपल्या आयुष्यात खूप काही मिळवले आहे, त्या विचार करू लागतात की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी कठोर परिश्रम करावे लागे. येथे महिलांना आपल्या लाइफ पार्टनरला समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. माझ्या बाबतीत गोष्टी वेगळ्या आहेत, माझे जग वेगळे आहे. तो (विजय) असा माणूस आहे ज्याला माझे विश्व चांगले समजते.तमन्ना आणि विजयच्या नात्याची चर्चा सुरू सुरु झाली, जेव्हा दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो नवीन वर्षाच्या निमित्ताने काढला होता. फोटोमध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसले. त्यानंतर दोघे अनेक पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसले. दोघेही अनेकदा एकाच कारमधून लंच आणि डिनरसाठी बाहेर जाताना दिसले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.