बॉलिवूड हादरले! मलायका अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल; इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले
मुंबई : बॉलिवूड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मलायका अरोराच्या वडीलांनी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर बॉलिवूड मध्ये एकच खळबळ उडाली आहे.आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Malaika Arora father news)
मलायकाचे वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांनी टोकाचे पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. अनिल अरोरा यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आयुष्याचा शेवट केला हे अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
वडीलांनी आत्महत्या केल्याचे कळताच अभिनेत्री मलायका अरोरा पुण्यातून तातडीने मुंबईसाठी रवाना झाली. या घटनेची माहिती मिळताच मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा अरोरा यांच्या घरी दाखल झाला.