File Photo
ऐश्वर्या राय बच्चन आणि आलिया भट्ट या बॉलिवूडमधील ब्युटीफुल अभिनेत्रींनी 'पॅरिस फॅशन वीक २०२४' मध्ये रॅम्प वॉक केला. दोघींचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ऐश्वर्याने रेड वन पीसमध्ये रॅम्प वॉक केला. आलियाने मेटॅलिक सिल्व्हर बस्टियर घातलेले दिसले. हे तिने काळ्या ऑफ-शोल्डर जंप सूटसह पेअर केले होते. ॲशच्या या वन पीस गाऊनचा ट्रेल नेण्यासाठी चार जण लागले. इव्हेंटमध्ये ॲश 'ब्रिजर्टन' फेम अभिनेत्री सिमोन अॅश्ले, इवा लॉन्गोरिया आणि कॅमिला कॅबेलो यांच्यासोबत गप्पा मारताना दिसली. रॅम्प वॉक संपल्यावर तिने सर्वांना अभिवादन केले. दुसरीकडे आलियाने अमेरिकन अभिनेत्री अँडी मॅकडोलसोबत येथे रॅम्प वॉक केला. तिने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हजारो चाहत्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये ॲश आणि आलिया या दोघींचे राणी असे वर्णन केले आहे.
ऐश्वर्या आणि आलियाशिवाय इतर अनेक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल्सनीही स्टेजवर रॅम्प वॉक केला. आई सोनी राजदान आणि अनन्या पांडेसह अनेक सेलिब्रिटींनी आलियाच्या पोस्टचे कौतुक केले. कामाच्या आघाडीवर, ऐश्वर्याचा शेवटचा चित्रपट 'पोनियिन सेल्वन २' होता. आलिया लवकरच 'जिगरा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.