अनुष्का आणि अफवा
अनुष्का शेट्टी साऊथ इंडस्ट्रीजमधील एक दमदार अभिनेत्री असून बाहुबलीमुळे देशभर गाजलेल्या अनुष्काची एक विशेष ओळख म्हणजे आपल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिकांची निवड. अभिनय कौशल्याशिवाय अनुष्का एक नम्र आणि दिलदार व्यक्ती म्हणूनही तेवढीच लोकप्रिय असून तिच्या या स्वभाव वैशिष्ट्याची सवर्त्र चर्चा होत असते. दीर्घकाळ पडद्यापासून दूर राहिलेली अनुष्का आता महेश बाबूबरोबरच्या मिस शेट्टी, मिस्टर पोलिशेट्टी चित्रपटातून चाहत्यांना दर्शन घडवणार आहे.
तेलुगू चित्रपटाचा एक अविभाज्य भाग असलेल्या अनुष्काबद्दल नेहमी कोणत्या ना कोणत्या अफवा उडत असतात. एका अफवेनुसार तिने गुप्तपणे विवाह केल्याचीही चर्चा होती. अनेक वेळा सहकलाकर आणि दिग्दर्शकांशी तिचे नाव जोडले गेले आहे. जजमेंटल है क्या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रकाळ कोव्हेलामुदी बरोबर तिचे अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. अफवांनी तिचा पाठलाग कधीही सोडलेला नाही. असे असले तरी त्याचा आपल्या करिअरवर तिने कधी परिणाम होऊ दिलेला नाही. एका मुलाखतीत तिला कथित प्रेम प्रकरणाविषयी काय वाटते, या प्रश्नावर ती शांतपणे म्हणाली होती की, अफवांचा परिणाम होत नाही असे नाही. मात्र, त्याकडे लक्ष द्यावयाचे नाही असे मी ठरवून टाकले आहे. मात्र, सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचे. त्यावेळी मी आई-वडिलांना फोन करून सांगायचे. ते ऐकून घ्यावयाचे आणि आयुष्यात असे प्रसंग येत राहतात, त्याकडे आपण पार गांभीऱ्याने पाहावयाचे नाही, असा सल्ला द्यावयाचे. आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सर्वांशी नम्रतेने वागण्याचा सल्ला ते द्यावयाचे.
मी गुपचूप चोरून लग्न केल्याच्या बातम्या तर अनेक वेळा आल्याचे सांगून ती म्हणते की, या बातम्यांनुसार मी पाच वेळा लग्न केले आहे. आता या बातम्या मला मजेशीर वाटतात. त्या वाचते आणि करमणूक झाले की त्याकडे दुर्लक्ष करते.
दरम्यान, अनुष्काची ४० वी फिल्म आता येत असून त्याचे अगोदरचे नाव नवीन पोलिशेट्टी असे होते. आता त्याचे नाव बदलून मिस शेट्टी, मिस्टर पोलिशेट्टी असे केले आहे. चार वर्षांनंतर अनुष्का मोठ्या पडद्यावर चाहत्यांना दर्शन देणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.