किस्सा हँडपंपचा

बाॅलिवूडमधील ‘ढाई किलो का हाथ’ स्पेशालिस्ट सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर २’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सनीपाजींच्या गाजलेल्या हँडपंपच्या सीनबाबत इंटरेस्टिंग किस्सा सांगितला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बाॅलिवूडमधील ‘ढाई किलो का हाथ’ स्पेशालिस्ट सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर २’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सनीपाजींच्या गाजलेल्या हँडपंपच्या सीनबाबत इंटरेस्टिंग किस्सा सांगितला.

 ‘गदर’ चित्रपटात हातपंप उखडून टाकण्याचा सीन लोकांना खूप आवडले होते. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी हे दृश्य कोणालाच समजले नाही. सनी देओलनेही ते करण्यास नकार दिला होता. याबाबत अनिल शर्मा म्हणाले, ‘‘जेव्हा मी चित्रपटातील हातपंपाच्या दृश्याचा उल्लेख केला, तेव्हा अनेकांना ते समजले नाही. लेखक, निर्माता आणि अगदी सनीलाही ते आवडले नाही. त्यामुळे आमचे शूट काही तास थांबवण्यात आले आणि या सीनवरून वाद झाला होता.’’

चित्रपटात या दृश्याचा समावेश करण्यामागे माझा हेतू होता की जर कोणी माझ्या देशाबद्दल वाईट बोलले तर माझा राग इतका वाढेल की मी इमारत उखडून टाकू शकेन. तो राग दाखवण्यासाठी मला जमिनीतून सहज बाहेर काढता येईल, असे काहीतरी हवे होते. एखादे झाड किंवा कारंजे खूप मोठे असते, म्हणून मी हातपंप जोडला. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमान जी द्रोणगिरी पर्वत उचलू शकतात, तर तारा सिंहदेखील तेच करू शकतात, असा खुलासा अनिल शर्मा यांनी मुलाखतीत करताच जोरदार हशा पिकला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story