आलिया निघाली हॉलिवूडला!
बॉ लिवूडची लाडकी आलिया भट्टही आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन या हेरगिरीवरील चित्रपटातून आलिया भट्टने हॉलिवूडमध्ये पाऊल टाकत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या पावणेतीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळते. या चित्रपटात गॅल गडोत आणि जेनी डोर्नन यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर आपली लाडकी आलिया भट्ट खलनायिकेच्या भूमिकेत पाहावयास मिळणार आहे.
चित्रपटात गॅल गडोत एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. आपले ध्येय, उद्दिष्ट गाठताना ती अनेक अडचणींना सामोरे जाते. चित्रपटातील संवादही जबरदस्त आहेत. आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'हार्ट ऑफ स्टोन' चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर समोर येताच आलियाला नकारात्मक भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट टॉम हार्परने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वेघोफर, झिंग लुसी आणि पॉल रिडी यांच्याही भूमिका आहेत.
नेटफ्लिक्सचा एक कार्यक्रम ब्राझीलमध्ये होत असून आलिया भट्ट ब्राझीलमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. कार्यक्रमात या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या सर्व चित्रपटांचे पोस्टर्स आणि ट्रेलर प्रदर्शित केले जातील. आलिया ब्राझीलला पोहोचली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिने याची माहिती दिली. गुलाबी सॅटिन ड्रेसमधील फोटो शेअर करत आलिया म्हणतो की, ती सध्या जेट लॅगशी लढत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, बार्बीला जेट लॅग मिळाला आहे. या पोस्टवर करीना कपूरने कमेंट केली आहे. ती म्हणते की, तू सर्वोत्तम का आहेस?... कारण तू आहेस.
आलिया भट्ट यापूर्वी अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र: पार्ट वन चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की लव्ह स्टोरी या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटावयास येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंग नायकाच्या भूमिकेत असेल. या चित्रपटात जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय आलिया फरहान अख्तरचा आगामी 'जी ले जरा' हा चित्रपट करत आहे. आलिया शिवाय या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा-जोनास यांच्याही भूमिका आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.