संग्रहित छायाचित्र
जलोटा म्हणाले, ‘‘सलमानने जरी काळवीट मारलेले नसले तरी त्याने बिष्णोई मंदिरात जाऊन माफी मागावी. आपल्या कुटुंबाच्या आणि जवळच्या लोकांच्या सुरक्षेसाठी त्याने हे पाऊल उचलले पाहिजे.’’
‘भजन सम्राट’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या अनुप जलोटा यांना अलीकडेच एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली. ‘‘माझी सलमानला एक छोटीशी विनंती आहे की त्याने मंदिरात जाऊन स्वतःच्या, त्याच्या कुटुंबाच्या आणि जवळच्या मित्रांच्या कल्याणासाठी माफी मागावी. मला खात्री आहे की ते त्यांची माफी स्वीकारतील. सलमानने जाऊन पुन्हा सुरक्षित जीवन जगावे. प्रकरणे गुंतागुंतीची करण्याची ही वेळ नाही. त्याने मारले असो वा नाही, सलमानने माफी मागावी. भांडणात अडकून कोणाला काही मिळणार नाही,’’ असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
जलोटा पुढे म्हणाले, ‘‘मला एवढेच सांगायचे आहे की कोणी मारले आणि कोणी केले नाही यात अडकण्याची ही वेळ नाही. सलमानचा जवळचा मित्र बाबा सिद्दिकी याची हत्या झाल्यावर आपण काय ते समजले पाहिजे. आता हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला पाहिजे.’’
काही दिवसांपूर्वी लेखक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता सलीम खान यांनी सांगितले होते की, ‘‘सलमानने कधीही काळवीटाची शिकार केली नाही. म्हणून त्याने माफी मागण्याचे कारण नाही. आम्हाला सतत धमक्या आल्या आणि आमचे स्वातंत्र्य हिरावले गेले. सलमानने काही गुन्हा केला आहे का? तुम्ही तपास केला आहे का? आम्ही कधी बंदुकीचा वापरही केला नाही. सलमान म्हणाला की, मी त्यावेळी तिथे नव्हतो, त्याला प्राणी मारण्याची आवड नाही... त्याला प्राणी आवडतात.’’
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सहा दिवसांनी १८ ऑक्टोबरला सलमानला पुन्हा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे देण्यात आली. या मेसेजमध्ये लिहिले आहे की, ‘‘ सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्ससोबतचे वैर संपवायचे असेल तर त्याला पाच कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत, तर सलमानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षाही वाईट होईल.’’
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याने नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे.