आंतरराष्ट्रीय चित्रपटात अदा शर्मा करणार काम
अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये तिने ‘शालिनी उन्नीकृष्णन’ हे पात्र साकारले असून, तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रम भट्ट यांच्या ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘द केरला स्टोरी’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत असून अदा शर्माकडेही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.
लवकरच अदा एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात ती महिला सूपरहिरोची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही लवकच सुरुवात होणार आहे. अदा एका आंतरराष्ट्रीय प्रॉडक्शनच्या बॅनरखाली काम करणार आहे. या चित्रपटात ती महिला सूपरहिरोची भूमिका साकारणार आहे. मात्र, अदाने अद्यापही या चित्रपटापटाबाबत अधिक माहिती दिलेली नाही.
अदा म्हणाली, “मला नेहमीच महिला सुपरहिरो खूप छान वाटतात आणि मी एवढेच म्हणू शकते की, मी सध्या अशीच एक भूमिका करीत आहे आणि लवकरच याबद्दल अधिक माहिती तुम्हाला कळेल. अॅक्शन प्रकार मला आवडतो. मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. मी भाग्यवान आहे की लोक वेगवेगळ्या भूमिकांसाठी माझा विचार करत आहेत. मला वाटले की ही खूप वेगळी भूमिका आहे. जेव्हा मी माझ्या चित्रपटाचा ट्रेलर घेऊन येईन तेव्हा मी या प्रोजक्टबाबत सांगेन.”
अदा शर्माचा सध्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘द केरला स्टोरी’ बद्दल बोलायचे तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २३८ कोटींची कमाई केली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित हा चित्रपट ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.