आमिरने चित्रपटातून ब्रेक घेण्याची घोषणा केली
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतरच आमिरने चित्रपटातून ब्रेक घेण्याची घोषणा केली. आता अलीकडेच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये त्याने असाकाही विचार बोलून दाखवला की अनेकांसाठी तो धक्काच होता.
तिने म्हटले आहे की, मला चित्रपट सोडायचे आहेत. रिया चक्रवर्ती काही काळापासून तिचे पॉडकास्ट चालवत आहे. तिच्या पॉडकास्टची पहिली पाहुणी सुष्मिता सेन होती. आता आमिर तिच्या पॉडकास्टचा पुढचा पाहुणा बनला आहे. अलीकडेच रियाने या पॉडकास्टचा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये आमिर करिअर आणि ब्रेकबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी तो म्हणतो, ‘‘मला चित्रपट सोडायचे आहेत. काही काळासाठी का होईना, मला या सर्वांतून ब्रेक हवा आहे.’’
रियाने संवादादरम्यान आमिरला विचारले की, जेव्हाही तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्हाला वाटते असे वाटते का, मी सुंदर दिसत आहे किंवा मी एक स्टार आहे किंवा मी आमिर खान आहे. यावर तो उत्तरला, ‘‘माझा जादूवर विश्वास आहे, परफेक्शनवर नाही. मला चित्रपटांपासून दूर जायचे आहे.’’ यावर रियाने त्याला ‘‘तुम्ही खोटे तर बोलत नाहीत ना,’’ असा प्रश्न विचारला. यावर आमिरने तो खरे बोलत असल्याचे सांगितले. तेव्हा रिया गमतीने म्हणाली, ‘‘तुमची लाय डिटेक्टर टेस्ट व्हायला हवी.’’
आमिरने त्याच्या आयुष्यातील ‘चॅप्टर टू’ बद्दल सांगितले आहे. संभाषणादरम्यान त्याने हृतिक रोशनचे वर्णन हँडसम असे केले आहे, तर शाहरुख खान खरोखरच खूप देखणा असल्याचेही तो म्हणाला. सलमानलाही त्याने हँडसम म्हटले. जेव्हा रियाने त्याला सांगितले की तो देखील खूप देखणा आहे आणि संपूर्ण देश पहिल्यांदाच तिच्याशी सहमत असेल, तेव्हा प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला, ‘‘असे काही नाही. लोक माझ्या कपड्याची खिल्ली उडवतात.’’ यावर रिया त्याची फिरकी घेत म्हणाली, ‘‘तुम्ही स्टायलिश आहात, असे मी कधीच म्हटले नाही.’’ हे ऐकून आमिर खान मोठ्याने हसला.
या पॉडकास्टचा ट्रेलर रिलीज करताना रिया चक्रवर्तीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून लिहिले आहे की, ‘‘खऱ्या स्टार आणि खऱ्या मित्राचे स्वागत करताना मी खूप रोमांचित आहे. त्यांचे अनुभव, स्टारडम, पालकत्व, दु:ख आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी संपर्कात राहा.’’
आमिरचा शेवटचा २०२२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ हा होता. तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, त्यानंतर आमिरने चित्रपटातून ब्रेक घेण्याची घोषणा केली. आमिरने लापती लेडीजची निर्मिती केली, जी खूप गाजली. हा चित्रपट त्याची माजी पत्नी किरण राव हिने दिग्दर्शित केला होता.