काळजाला भिडणारी कथा

राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘पाणी’ चित्रपट आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केला आहे

Vidya Balan, Bhool Bhulaiyaa 3, Diwali release, Movie teaser, Manjulika character, Bollywood actress, Upcoming film, Audience reunion, Horror-comedy

File Photo

राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘पाणी’ चित्रपट आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. हा टीझर पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. अशातच चित्रपटाच्या शीर्षकगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘पाणी’ चित्रपटाचे शीर्षकगीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स प्रस्तुत कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘पाणी’ चित्रपटातील मनाला उभारी देणारे ‘नगं थांबू रं’ हे शीर्षकगीत प्रदर्शित झाले आहे. आदिनाथ कोठारेने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला गुलराज सिंग यांनी साजेसे संगीत दिले असून हे प्रेरणादायी गाणे शंकर महादेवन यांनी आपल्या दमदार आवाजात गायले आहे.

मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’ची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाचे शीर्षकगीत अतिशय स्फूर्तिदायी आहे. या गाण्यातून हनुमंत केंद्रे यांचा पाण्यासाठीचा लढा, संघर्ष आणि त्यांना मिळालेले यश निदर्शनास येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या मनाला भिडणारे असून नवीन उमेद देणारेही आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने पाणीटंचाई सारखी भीषण समस्या सोडवून गावकऱ्यांना आशेचा किरण दाखवणारे हे गाणे आहे.

अतिशय भावपूर्ण बोल असलेले हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. या गाण्याबद्दल शंकर महादेवन म्हणाले की, ज्यावेळी या गाण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली, तेव्हा मी त्वरित होकार दिला. या गाण्याचे बोल मनाच्या खोलवर रुजणारे आहेत. मनातील खंत, संघर्ष, यश, आनंद अशा सगळ्याच भावना या गाण्यातून एकत्र व्यक्त होत आहेत. हे गाणे गाताना माझ्यातही तितकाच उत्साह होता. अतिशय उत्स्फूर्त गाणे आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीशी लढा देताना हे गाणं प्रत्येकाला प्रेरणा देणारे ठरेल.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story