ज्यांना दिल्या शुभेच्छा त्यांचाच फोटो गायब; पंढरपुरातील बॅनर राज्यभरात चर्चेत

पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण या ठिकाणी आमदार अवताडे यांचे अभिनंदन करणारे फलक कार्यकर्त्यांनी लावले आहेत. मात्र या फलकावरील अवताडे यांचा फोटो गायब असल्याने हा सध्या शहरात आणि आता सोशल मीडियामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 1 Dec 2024
  • 04:59 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अभिनंदनाच्या बॅनरवर ज्याची जाहिरात त्यांचाच पडला विसर

सोलापूर : सध्या निवडून आलेल्या आमदारांचे सर्वत्र मोठ-मोठे फलक आणि बॅनर झळकताना दिसत आहेत. मात्र ज्याचे अभिनंदन करायचे त्याचा फोटोच बोर्डवर गायब असेल तर काय होईल. होय अशीच मजेशीर गोष्ट पंढरपूर शहरात घडली असून आमदार समाधान अवताडे यांना शुभेच्छा दिलेल्या बॅनरमध्ये खुद्द अवताडे यांचा फोटो गायब आहे. पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण या ठिकाणी आमदार अवताडे यांचे अभिनंदन करणारे फलक कार्यकर्त्यांनी लावले आहेत. मात्र या फलकावरील अवताडे यांचा फोटो गायब असल्याने हा सध्या शहरात आणि आता सोशल मीडियामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

आमदार अवताडे यांच्या अभिनंदन करणाऱ्या या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे फोटो लावलेत.  मात्र यात ज्यांचे अभिनंदन करतो ते आमदार समाधान अवताडे यांचाच फोटो विसरले आहेत. शहरात इतर ठिकाणीही परिचारक समर्थकांनी जिंकल्याच्या शुभेच्छा देताना कोणत्याच बॅनरवर अवताडे यांचा फोटो ठेवलेला नाही. मात्र निवडून आलेले आमदार समाधान अवताडे मात्र त्यांच्याच अभिनंदन फलकावर त्यांचाच फोटो नाही अशी मजेशीर बॅनरबाजी पंढरपुरात सध्या दिसत आहे.

रयत क्रांती संघटनेचे विठुरायाला साकडे
राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरच्या विठुरायाला दुग्धाभिषेक करून पेढे वाटत साकडे घातले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्याच्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले व पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरीजवळ विठुरायाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला. देवेंद्र फडणवीस हेच खरे बहुजन उद्धारक असून शेतकऱ्यांची जाण केवळ त्यांना आहे. शेतकरी कर्जमुक्तीसाठी फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे विठुरायाला घातल्याचे रयत क्रांती संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी सांगितले.  यावेळी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील भाविकांना आणि नागरिकांना पेढ्यांचे वाटप केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest