संग्रहित छायाचित्र
आधार कार्डप्रमाणाचे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा "युनिक फार्मर आयडी" तयार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या "ॲग्रीस्टॅक" योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या यूनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या लँड रेकॉर्डला जोडण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या आयडीमुळं शेतऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकरी आधार कार्ड नोंदणीसाठी लवकरच गावागावात खास मोहिम सुरु होणार आहे. याच आधार आयडीद्वारे शेतकऱ्यांना सर्वा शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. "ॲग्रीस्टॅक" योजनेअंतर्गत तयार होणारा युनिक शेतकरी आधार भविष्यात कोणकोणत्या कामात उपयोगी येणार हे आज आपण जाणून घेऊयात.
"युनिक फार्मर आयडी", काय आहे विशेष ?
पीएम किसान योजनेचं अनुदान, किसान क्रेडिट कार्ड, पिक विमा आणि परतावा यासाठी शेतकरी आधार आवश्यक आहे.
पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी, शेती-पीक सर्वेक्षण तसेच शेतमालाच्या शासकीय केंद्रावरील विक्रिसाठी शेतकरी आधार आवश्यक
कृषी विभागाच्या विविध योजनाअंर्गत कृषी निविष्ठा आणि इतर सेवेंचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे.
बाजारपेठेची माहिती, कृषी विषयक कामासंदर्भात कृषी तज्ञांचे मार्गदर्शन मिळविणे यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे.
शेतकरी आधार कार्डचा सरकारलाही फायदा
सरकारलाही या युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याची कुठे किती जमीन आहे. कोणता शेतकरी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहे हे सर्व एका क्लिकवर समजणार आहे.
तसेच, या युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून सरकारला चालू हंगामात राज्यातील किती शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले आहे हे कळणार. यासोबतच, जिओ रेफरन्सिंगचे माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.