गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन संतापाची लाट उसळली आहे. हत्येचे हे प्रकरण आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये सातत्याने धनंजय मुंडे यांच नाव समोर येत होते. अशातच अखेर मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाण साधला होता. दोनदिवसांपूर्वी, अनेक पुरावे ट्विट करत देशमुख हत्येप्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर येणाऱ्या वाल्मिकी कराड याच्याशी धनंजय मुंडे यांचे खास संबंध असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'माझ्या जवळचा कोणी जरी असेल तरी शिक्षा ही झालीच पाहिजे.' असं वक्तव्य मुंडे यांनी यावेळी केलं.
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना शिंक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला सोडायचं नाही आणि तो किती ही कोणाच्या जवळचा असला तरी त्याला शिक्षा झालील पाहिजे. माझ्याही जवळचा असला तरी फाशी झाली पाहिजे. माझ्यासह वाल्मिकी कराडांची जवळीक सुरेश धस यांच्यासोबतही. माझी राजकीय प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मीडिया ट्रायमध्ये माझ नाव खराब करण्यात येत आहे. हे खुनाचं ते प्रकरण आहे ते भयंकर आहे.
बीड प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मी माझा 100 दिवसांचा कार्यक्रम त्यांना दिला. असं मुंडे यावेळी म्हणाले.
दमानियांचा मुंडेंवर रोख
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा करत दमानिया यांनी सातबाऱ्याचे पुरावे दिले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.