रोहित पवारांचे स्पष्टीकरण
शरद पवार यांनी मुंबईत शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर शरद पवार पुण्यातील मोदी बागेत आले. मात्र, शरद पवारांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नसल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शरद पवार पुण्यात आल्यानंतर त्यांच्या सोबत रोहित पवार देखील आले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांना अजित पवारांबाबत विचारणार करण्यात आली. यावर स्पष्टीकरण देताना रोहित पवार म्हणाले की, “शरद पवारांच्या या निर्णयाबाबत स्थापन केलेल्या कमिटीमध्ये स्वतः अजितदादा होते. सिल्वर ओकमध्ये सर्व नेते उपस्थित होते. यावेळी तिथे सर्वात पहिले दादा स्वतः आले होते.”
“सिल्वर ओकमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत कमिटीमध्ये कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला याबाबतची चर्चा देखील केली. जसे ठरले होते तसेच घडले आहे, त्यामुळे कोणालाही काही वाटत असेल तर ते अजितदादा यांच्याबद्दल खरे नसेल”, असेही रोहित पवार यांनी बोलताना म्हणाले.