राज्य उत्पादन शुल्ककडून २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील कारवाईत अवैध हातभट्टी दारू, देशी, विदेशी दारूची वाहतूक, विक्री व इतर साहित्य असा एकूण २३ लाख ७३ हजार ९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 9 Nov 2024
  • 05:06 pm
State, Excise Department, seized ,goods ,23 lakh rupees,Ahilyanagar, Solapur, Bharari team

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील कारवाईत अवैध हातभट्टी दारू, देशी, विदेशी दारूची वाहतूक, विक्री व इतर साहित्य असा एकूण २३ लाख ७३ हजार ९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी याबाबत माहिती दिली. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अवैद्य दारू निर्मिती वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने मोहीम आखून पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यातील अवैद्य गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या, बनावट विदेशी मद्य निर्मितीच्या तसेच अवैद्य दारू विक्रीच्या ठिकाणावर सातत्याने छापे मारून एकूण २७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये १४ वारस आणि १३ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे.

या कारवाईमध्ये आतापर्यंत १२ आरोपींविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून २६ हजार ८०० लिटर अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे रसायन, ३ हजार ४३८ लिटर अवैध गावठी हातभट्टी दारू, १४४ लिटर बनावट मद्य, मद्य वाहतुकीची ३ वाहने आणि इतर साहित्य असा एकूण २३ लाख ७३ हजार ९५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुय्यम निरीक्षक व्ही. एम. माने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest