संग्रहित छायाचित्र
महायुतीच्या मंत्र्यांची शपथविधीची तारीख निश्चित नाही. राजभवनात जोरदार राजकीय हालचाळींना वेग आला आहे. शनिवारी १५ ते २० मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी माहिती मिळत आहे. त्याबरोबरच अजित पवार गटाच्या पाच तर एकनाथ शिंदे गटाच्या केवळ पाच मंत्र्यांना सुरुवातीला शपथ देण्यात येणार आहे. भाजपच्या सर्वांधिक ८ ते १० मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये सहा आमदारांमागे एक मंत्र हे सूत्र निश्चित झाल्यानंतर शिवसेनेचे अनेक मंत्री रेडझोनमध्ये आलेले आहेत. त्यांच्यामध्ये चुळबूळ चालू आहे. अनेक माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्यामुळे धाकधूक वाढली आहे. पहिल्या यादीत अनेक मंत्र्यांची नावे नाहीत असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामध्ये तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड असे चेहरे आहेत. ज्याच्या राजकीय कारकीर्द ही काहीनाकाही कारणाने वादग्रस्त राहिली आहे.
या यादीसोबतच शिवसेनेची एक संभाव्य यादीदेखील दिवसभर माध्यमांमधून फिरत होती. ज्यामध्ये एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, भरत गोगावले, आशिष जैयस्वाल, योगेश कदम, विजय शिवतारे अशी नावे आहेत.
मंत्र्यांनी तीन शिफ्टमध्ये काम करावे, दानवेंचा खोचक सल्ला
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार आहे. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रिपदासाठी मिळणार असल्याचे ठरले आहे, यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांनी तीन शिफ्टमध्ये काम करावे, असा खोचक सल्ला दानवेंनी दिला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.