लाडक्या बहिणीबद्दल विरोधकांची दुटप्पी भूमिका; प्रवीण दरेकर यांचा आरोप

महायुती सरकार म्हणून आम्ही मतदारांच्या समोर जाताना अडीच वर्षातील विकासाची शिदोरी घेऊन जात आहोत. लाडकी बहीण योजना माध्यमातून दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जाणार आहे. ती रक्कम वाढवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 7 Nov 2024
  • 04:34 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महायुती सरकार म्हणून आम्ही मतदारांच्या समोर जाताना अडीच वर्षातील विकासाची शिदोरी घेऊन जात आहोत. लाडकी बहीण योजना माध्यमातून दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जाणार आहे. ती रक्कम वाढवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. आघाडीमधील नेते ही योजना बंद करण्यासाठी धडपड करत असताना काही नेते ही योजना स्वतःच्या कार्यालयातून राबवत दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी (दि. ६) केला.

 आम्ही ताकदीने ही योजना पुढे नेणार आहे कारण हा सामाजिक विषय आहे. महिलांचे संसार यावर चालणार नसले तरी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडत आहे. या निवडणुकीत महिला गेम चेंजर ठरणार आहे, असे मत  दरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

 दरेकर पुढे म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडी फसव्या घोषणा देण्यात आघाडीवर आहे. फेक नरेटिव्ह माध्यमातून अवास्तव खोटे मुखवटे लावले आहे ते जनता यंदा निवडणुकीत उतरवल्या शिवाय राहणार नाही. कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, वीजबिल माफी अशा घोषणा उध्दव ठाकरे यांनी सत्तेत असताना दिल्या. पण त्यांची पूर्तता केली नाही. हिरवी शाल पांघरून ते हिंदुत्ववादी भूमिका घेत आहे.’’

 लोकसभा निवडणुकीत आघाडीकडून जे संभ्रमित करण्यात आले ,त्याचा वचपा यंदाच्या निवडणुकीत जनता घेईल. लखपती दीदी, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, शेतकरी यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून सन्मान निधी मिळत आहे. शेतकरी कर्जमाफी निर्णयदेखील झाला आहे. शेतकरी कृषी पंप यांना वीज माफी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात सिंचन प्रकल्पांना कोणती मंजुरी मिळू शकली नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी १०६ सिंचन प्रकल्प मंजुरी दिली. सरकार आल्यावर पुढील १०० दिवसातील आमचे व्हिजन तयार आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न युती सरकार करत आहे, असे यावेळी दरेकर यांनी नमूद केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest