संग्रहित छायाचित्र
जामीन मंजूर करण्यासाठी न्यायाधीशानेच लाच मागितल्याची तक्रार एका महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर महिलेच्या तक्रारीच्या आधारे न्यायाधीशाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच न्यायाधीश फरार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सातारा शहर पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत साताऱ्यात न्यायाधीश धनंजय निकम, माण तालुक्यातील दहिवडीचा मध्यस्थ आनंद खरात व मुंबईतील वरळी येथे राहणारा किशोर खरात यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सातारा सत्र न्यायालयामध्ये अटक टाळण्यासाठी न्यायाधीश धनंजय निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
तक्रारदार तरुणीच्या वडिलांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात त्यांना जामीन देण्यासाठी न्यायाधीश निकम आणि त्यांच्या साथीदारांनी तक्रारदार महिलेकडे लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जामीन अर्ज करण्यापासून जामीन देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सुलभतेने पार पाडण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या सगळ्यासाठी एका आरोपीने तक्रारदार महिलेची आणि न्यायाधीशांची भेटही घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. महिलेने केलेल्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतरच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणात एका २४ वर्षीय तरुणीने दाखवलेले धाडस यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. तरुणी ही आरोपीची मुलगी आहे. वडिलांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होऊन न्यायालयीन कोठडीत आहे. परंतु आरोपीला शिक्षा द्यायच्या ऐवजी आरोपीच्या जामिनासाठी लाच मागणारा न्यायाधीश हे वास्तव भयानक आहे.
पाच लाखांची होती डिल
न्यायालयीन कोठडीत असलेल्या वडिलांना जामीन मिळवण्यासाठी या तरुणीने प्रयत्न केला. तिच्या वडिलांचा जामिनाचा अर्ज बऱ्याच काळापासून कोर्टापुढे प्रलंबित होता. या दरम्यानच्या काळात आनंद खरात आणि किशोर खरात या मध्यस्थांनी न्यायाधीश धनंजय निकम याला लाच द्यावी लागेल आणि हे धनंजय निकम यांच सांगण्यावरून आम्ही करत आहोत, त्यासाठी पाच लाख रुपये लागतील असे या दोघांनी सांगितले. तरुणीला हे खरे वाटले नाही, पण तिने अशा प्रकारची न्यायव्यवस्था असेल, तर ती खोडलेलीच बरी म्हणून पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.