सोलापूर : 'दक्षिण शहर'च्या उमेदवाराचा अर्ज अखेर वैध

सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी अखेर मंजूर केला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईपर्यंत हलवली सूत्र; उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज मंजूर

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागली आहे. सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी अखेर मंजूर केला.

 यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्ष देखील ताकदीने उभा राहिला आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आक्रमक पवित्रा घेतला असून अनेक उमेदवार जाहीर केले आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार मिलिंद मुळे यांनी उमेदवार कोगणूरे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवल्याचे सांगितले. या अर्जावर दोन्ही बाजूंनी सुनावणी झाली निवडणूक अधिकारी सुमित शिंदे यांनी निकाल पाच वाजेपर्यंत राखून ठेवला होता. त्यांनी मिलिंद मुळे यांची हरकत फेटाळून लावत कोगनुरे यांचा अर्ज वैध ठरवला. वकील कक्कळमेली यांनी या प्रकरणामध्ये अधिक माहिती दिली.

मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, शहर उत्तरचे उमेदवार प्रशांत इंगळे, शहर मध्यचे उमेदवार नागेश पासकंटी, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे, सचिव रोहित कलशेट्टी हे प्रमुख पदाधिकारी दिवसभर निवडणूक निर्णय कार्यालयासमोर ठाण मांडून होते. उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या अर्जावर हरकत घेतल्याची समजताच पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबईला फोन लावून सूत्र हलवली असल्याचे समजले. दिवसभर मुंबईच्या राजगड कार्यालयात अपडेट देत राहिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest