संग्रहित छायाचित्र
सोलापूर : सामूहिक दुष्कर्म प्रकरणातील ११ पैकी ८ आरोपींना दुहेरी जन्मठेप, तर तीन आरोपींना २० वर्षे कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी २१ हजार दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी ठोठावला. या प्रकरणात ३८ जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. घटनेच्या चार वर्षांनंतर निकाल आला आहे.
प्रवीण श्रीकांत राठोड, आनंद उर्फ राजवीर राम राठोड, गणेश ऊर्फ अक्षय विष्णू चव्हाण, रोहित श्याम राठोड, दिनेश परशू राठोड (टिकटॉक किंग), चेतन राम राठोड,करण विजयकांत भरले, सतीश अशोक जाधव या सर्व आरोपींना पोक्सो कायदा कलम ३ व ४ खाली जन्मठेप आणि कलम पाच व सहाखालीजन्मठेप झाली. तर सचिन श्रीकांत राठोड, राज ऊर्फ राजकुमार सिद्राम देसाई, गौरव विलास भोसले, या तिन्ही आरोपींना पोक्सो कायदा कलम ३ व ४ खाली २० वर्षे सश्रम कारावास झाला. पीडिता एका शैक्षणिक संस्थेत शिकत होती. तिची आरोपी सचिन राठोड यांची ओळख झाली. तिचे रूपांतर प्रेमात झाले. तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून त्याने दुष्कर्म केले. त्यानंतर त्याच्या ओळखीच्या इतर रिक्षाचालकांनी आळीपाळीने शहरातील विविध ठिकाणी नेत मुलीवर दुष्कर्म केले. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून ७ एप्रिल २०२० रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते.
आरोपीच्या वतीने अॅड. नागराज सुदाम शिंदे, ॲड. इस्माईल शेख, अॅड. सुरेश चव्हाण, अॅड.एस. एम. झुरळे व अॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले. तसेच यातील तपास अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार विक्रांत कोकणे व पोलीस हवालदार सुनंदा घाडगे यांनी काम पाहिले. आरोपी घटनास्थळी होते हे मोबाईल लोकेशनवरून सिद्ध झाले. सर्व आरोपी जेलमध्ये होते. फिर्याद देताना पीडीतेची मानसिकता ठीक नव्हती. मनोविकार तज्ञांची साक्षर नोंदवली होती. आरोपी पिढीच्या परिचयाचे नव्हते. त्यांची ओळख परेड घेतली होती. घटना घडली त्या ठिकाणी एका आरोपीच्या ताब्यातील कागदपत्रे सापडली होती. मोबाईल व टॉवर लोकेशनवरून आरोपी घटनास्थळी होते हे कोर्टात सिद्ध केले, अशी माहिती सरकारी वकील एडवोकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली. एकूण ३८ साक्षीदार तपासले. सरकारी वकील अॅडवोकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी सरकारची बाजू मांडली.