संग्रहित छायाचित्र
अमरावती: राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या टीमने अमरावती शहरासह १७ ठिकाणी छापे टाकले असून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे . अमरावती शहरातील छायानगरमधून एनआयएने ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव मुसाईद असून त्याचे वय २७ वर्षे आहे. या युवकावर अमरावती शहरात विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, अमरावती शहरातील छायानगर परिसरातून एनआयच्या टीमने एका २७ वर्षे युवकाला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा युवक पाकिस्तान मधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा समोर आले आहे. हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक वेळा या तरुणाला पाकिस्तान मधून फोन आल्याचे प्राथमिक सूत्रांनी सांगितले आहे.अमरावती शहरासह एनआयए कडून १७ ठिकाणी छापे मारले आहेत. यातून अनेकांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने एकास घेतले ताब्यात आहे. कामरान अन्सारी (४५ वर्षे) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.