MPSC 2024 Schedule : एमपीएससी २०२४ मधील परीक्षांचे आंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) (एमपीएससी) (MPSC) २०२४ या वर्षात घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे आंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे अंदाजे २८ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

MPSC 2024 Schedule

एमपीएससी २०२४ मधील परीक्षांचे आंदाजित वेळापत्रक जाहीर

नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला ; राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) (एमपीएससी) (MPSC) २०२४ या वर्षात घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे आंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे अंदाजे २८ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत घेण्याचे नियोजित आहे. (MPSC 2024 Schedule)

एमपीएससीकडून शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षांसाठी राज्यातील लाखो विद्यार्थी तयारी करीत आहेत. त्यांना परीक्षांचे नियोजन करता यावे यासाठी एमपीएससीकडून परीक्षांचे आंदाजित वेळापत्रक दरवर्षा जाहीर केले जाते. यंदा देखील २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. साधारपणे नोव्हेंबर महिन्यात एमपीएससीकडून पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. त्यानुसार वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

एमपीएससीने २०२४ मध्ये १६ परीक्षांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षांचा समावेश आहे. शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, त्यानंतरच नियोजित महिन्यामध्ये वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असल्याने त्यामध्ये बदल देखील होण्याची शक्यता आहे. तसा बदल झाल्यास एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा आदी परीक्षांचा समावेश आहे. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या वेबसाइटला भेट द्यावी असे आवाहन एमपीएससीने विद्यार्थ्यांना केले आहे. 

एमपीएससीने दिलेल्या वेळेत पुढील वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या निर्णयाचे एमपीएससीचे स्वागत करतो. वेळापत्रक जाहिर केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता त्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य नियोजन करता येईल.

  - महेश घरबुडे. कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती. 

'या' आहेत स्पर्धा परीक्षांच्या आंदाजित तारखा :

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्व परीक्षा - १७ मार्च

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २८ एप्रिल

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा - १६ जून

राज्यसेवा मुख्य परीक्षा - १४ ते १६ डिसेंबर

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २३ नोव्हेंबर

अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा - ९ नोव्हेंबर

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा - २८ ते ३१ डिसेंबर

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest