मुंबई गोवा महामार्गावर धावत्‍या बसला आग; आगीत बससह प्रवाशांचे साहित्‍य जळून खाक; सुदैवाने सर्व 34 प्रवासी बचावले

मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथं खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली. रात्री 12 वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

Bus fire on Mumbai Goa highway

मुंबई गोवा महामार्गावर धावत्‍या बसला आग; आगीत बससह प्रवाशांचे साहित्‍य जळून खाक; सुदैवाने सर्व 34 प्रवासी बचावले

मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथं खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली.  रात्री 12 वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्‍नीशमन दल , कोलाड रेस्‍क्‍यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले व आगीवर नियंत्रण आणले. 

बसमध्‍ये चालक आणि क्लिनरसह 34 प्रवासी होते. खापरोबा ट्रॅव्हल्सची  ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्‍वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्‍वे पुलाजवळ आली असता बसच्‍या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्‍हां ड्रायव्‍हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्‍याचे दिसले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्‍यात आले. त्‍यानंतर आगीचा भडका उडाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest