Crime News : दरोड्यातील टोळक्यांच्या ३६ तासात आवळल्या मुसक्या, नांदेड फाट्यावरील दुकानात केली होती लुटमार

आता नांदेड फाटा या ठिकाणी असणाऱ्या देशी दारूच्या दुकानात चक्क ४ जणांनी कुऱ्हाडीचा धाक दाखवत दारू पिणाऱ्या ग्राहकाला मारहाण केली. तसेच गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अवघ्या ३६ तासात हवेली पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Crime News : दरोड्यातील टोळक्यांच्या ३६ तासात आवळल्या मुसक्या, नांदेड फाट्यावरील दुकानात केली होती लुटमार

दरोड्यातील टोळक्यांच्या ३६ तासात आवळल्या मुसक्या, नांदेड फाट्यावरील दुकानात केली होती लुटमार

दुकानातील लुटमारीची सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात कोयता गँगने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता नांदेड फाटा या ठिकाणी असणाऱ्या देशी दारूच्या दुकानात चक्क ४ जणांनी कुऱ्हाडीचा धाक दाखवत दारू पिणाऱ्या ग्राहकाला मारहाण केली. तसेच गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अवघ्या ३६ तासात हवेली पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अमोल पद्माकर सोळंके (वय २२, रा. रुम नं.५०१ आई हाईटस्, गोकुळनगर धायरी फाटा, पुणे), मुक्तार जाहीद शेख (वय १९, रा. रुम नं.५०१ सिया क्लासिक, बेनकर वस्ती, धायरी, पुणे), अमोल भगवान शिर्के (वय २७, रा. गल्ली नं. ८ कोल्हेवाडी ता. हवेली जि.पुणे) आणि अभिषेक नागेश कांबळे (वय २२, रा. समर्थ मेडीकल वरती खंडोबामंदीर जवळ, अंजली नगर कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एक आरोपी पसार झाला असून त्यासोबत एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड फाटा येथील एका सरकारमान्य देशी दारूच्या दुकानात २६ डिसेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास चार जणांच्या टोळक्यांनी हातात कुऱ्हाड आणि कोयते घेऊन प्रवेश केला. आरोपींनी दुकानाचे शटर आतून बंद केले. त्यानंतर व्यावसायिकाच्या दुकानातील गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत दुकानातील ग्राहकांकडून रोख रक्कम आणि किमती ऐवज लुटला. त्यांना कुऱ्हाड आणि इतर धारदार हत्याराने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँगच्या नांग्या ठेचल्या आहेत. इतरांचाही लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे, हवेली पोलिसांना समोर आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आव्हान उभे होते. घडलेल्या प्रकाराबाबत माहिती मिळताच हवेली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपींनी सदर दुकानाव्यतिरिक्त एका पान टपरी चालकाला देखील गंभीर दुखापत करुन त्याचे जबरदस्तीने पैसे घेवून पळून गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीसांनी संबंधित परिसरातील सुमारे २० ते २५ ठिकाणच्या सीसीटीव्हीची पडताळणी केली होती. मात्र, आरोपी आपला ठिकाणा सातत्याने बदलत असल्याचे समोर आले.

अखेर गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत अवघ्या ३६ तासात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मात्र, एक आरोपी पसार झाला आहे. त्यासोबत एका विधीसंघर्षीत बालकाचा देखील समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर अग्निशस्त्र, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. मात्र, गुन्हात वापरलेले हत्यार आणि चोरीस गेलेला मुद्देमालाबाबतचा तपास अद्याप सुरू आहे.  

सदरची कामगिरी पोलीस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले-पाटील, हवेली विभाग व पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, हवेली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षख सागर पवार, पोहवा तोडकर, पोना गायकवाड, पोना मुंढे, पोना धनवे, पोशि चौधरी, पोशि काळे, पोशि गुंड, पोशि दरेकर तसेच तांत्रिक मदत सायबरचे पोना कोळी व पोशि पाटील यांचेसह इतर अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest