Pune : सांस्कृतिक पुण्यात हे काय! फक्त एक 'किस' दे म्हणत महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग

महात्मा फुले वस्तु (Mahatma Phule Museum of Art( संग्रहालयामध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याकडे 'कीस' मागत तिचा विनयभंग (molestation) करण्यात आला. ही घटना १३ डिसेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली.

molestation

फक्त एक 'किस' दे म्हणत महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग

पुणे : महात्मा फुले वस्तु (Mahatma Phule Museum of Art( संग्रहालयामध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याकडे 'कीस' मागत तिचा विनयभंग (molestation) करण्यात आला. ही घटना १३ डिसेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी संग्रहालयाच्या वरिष्ठ व्यवस्थापकाविरुद्ध डेक्कन पोलीस (Deccan Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

राजीव विनायक विळेकर (Rajeev Vinayak Vilekar) (वय ७०, रा. प्रभात रोड, डेक्कन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी भादवि ३५४ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिला महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी आहे. आरोपी हा वरिष्ठ व्यवस्थापक आहे. विळेकर हे या महिलेच्या टेबलजवळ गेले. त्यांना जवळ ओढून त्यांना ' एक कीस दे' असे म्हणाले. महिलेने त्यांना असे करण्यास  नकार दिला. त्यानंतर देखील त्याने हाच धोशा सुरू ठेवला. त्यानंतर 'तुला प्रॉब्लेम असेल तर आपण दरवाजा लावून घेऊ' असे म्हणत बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest