कोरेगाव पार्कमध्ये चाललंय तरी काय? रस्त्याने जाणाऱ्या तरुणींचा विनयभंग

पुणे : कोरेगाव पार्क भागात सतत काही ना काही घटना घडत आहेत. सोमवारी रात्री रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणीला पाहून अश्लील कमेंट करीत तिच्या पार्श्वभागावर जोरात फटका मारून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

संग्रहित छायाचित्र

दुचाकीवरून आलेल्या तरुणाने केले अश्लील कृत्य

पुणे : कोरेगाव पार्क भागात सतत काही ना काही घटना घडत आहेत. सोमवारी रात्री रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणीला पाहून अश्लील कमेंट करीत तिच्या पार्श्वभागावर जोरात फटका मारून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील लेन नंबर दोनमध्ये  सोमवारी रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान घडली. (Koregaon Park News) 

याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police Station) भादवि ३५४, ३५४(अ), ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी कोरेगाव पार्क परिसरात राहण्यास आहे. फिर्यादी तरुणी आणि तिची मैत्रीण लेन नंबर दोन मधील कृष्णकुमार बंगल्याजवळून चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून एक तरुण त्यांचा पाठलाग करत होता. त्यांच्या पाठीमागून आलेल्या या तरुणाने अरिहंत बंगल्या जवळ या  दोघींना अडवले. त्यांना अश्लील शिवीगाळ करीत तो पळून गेला. त्यानंतर थोड्या वेळाने तो पुन्हा कृष्णकुमार बंगल्याजवळ परत आला आणि पाठीमागून येऊन फिर्यादी तरुणीच्या पार्श्वभागाला जोरात फटका मारून पसारा झाला. 

या तरुणीने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेत संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू असून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest