Crime : औषधांच्या नावाखाली विदेशी मद्याची वाहतूक; ९३ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रात होणारी गोवा निर्मीत विदेशी मद्याची चोरटी वाहतुक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) उघडकीस आणण्यात आली आहे. या मद्याची बेकायदा वाहतूक (Illegal liquor) करणारा ट्रक राज्य उत्पादनच्या पथकाने पकडला

Illegal liquor

औषधांच्या नावाखाली विदेशी मद्याची वाहतूक; ९३ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

पुणे : औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रात होणारी गोवा निर्मीत विदेशी मद्याची चोरटी वाहतुक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) उघडकीस आणण्यात आली आहे. या मद्याची बेकायदा वाहतूक (Illegal liquor) करणारा ट्रक राज्य उत्पादनच्या पथकाने पकडला असून ८२ लाख ८ हजारांचे मद्य, ११ लाख ५० हजारांचा ट्रक असा एकूण ९३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चालकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २१ डिसेंबर पर्यंत ०२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Crime News) 

विपुल देविलाल नट (Vipul Devilal Nat)  (वय ३२, रा. देविलालजी नट व्हिलेज, बांसवाडा, राजस्थान) असे अटक चालकाचे नाव आहे. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाकडून बेकायदा मद्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषता: गोवा निर्मीत अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाईच्या करण्याच्या सूचना संचालक डॉ. विजय सुर्यवंशी, सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर दिल्या आहेत. त्यानुसार, भरारी पथक गस्तीवर होते. सोमवारी गस्तीवर असतानाच गोवा निर्मीत विदेशी मद्याची विक्री करण्यासाठी गोव्यामधून बेंगलोर - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरुन विक्रीसाठी एक ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने खेड शिवापूर टोल नाक्यावर सापळा लावला. याठिकाणी मंगळवारी पहाटे जीजे २३, एडब्ल्यू १९२१ हा ट्रक आलेला दिसला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा ट्रक ताब्यात घेतला.

चालकाकडे चौकशी केली असता त्याने गाडीत औषधे असल्याचे सांगितले. औषधांची बीले, टॅक्स इन्व्हाईस व ई वे बिल अशी कागदपत्रे दाखविली. परंतु, खातरजमा करण्याकरीता ट्रकमधील कंटेनरचे कुलुप उघडून पाहिले असता मद्याने भरलेले ९५० बॉक्स आढळून आले. त्यामध्ये 'रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की' या मद्याच्या ब्रॅण्डच्या १८० मिली लीटर क्षमतेच्या एकुण ४५ हजार ६०० सिलबंद बाटल्यांचा साठा अधिकाऱ्यांच्या हाती लागला. या बाटल्यांवरील लेबलांची पाहणी केली असता त्यावर 'रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की' व उत्पादक कंपनीचे नाव 'पिगॉट चॅपमॅन अॅण्ड कंपनी', कोलवेल इंडस्ट्रीयल इस्टेट, बारदेस, गोवा असे छापलेले दिसून आले.  

ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए. सी. फडतरे, तसेच जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल थोरात, पी. टी. कदम, भरत नेमाडे व जवान अमोल दळवी यांनी केली. पुढील तपास विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील करीत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest