Crime News: शस्त्रासह दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; एकास अटक

पिंपरी चिंचवड: कोयता आणि काठ्या हवेत फिरवत मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना

संग्रहित छायाचित्र

निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड: कोयता आणि काठ्या हवेत फिरवत मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (९ जानेवारी) रात्री ओटास्कीम निगडी येथे घडली. एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. (Pimpri Chinchwad News)

अजय रामू चौधरी (वय २१, रा. रुपीनगर तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह रितेश सोनवणे आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या घराचे नुकसान केले. हातात कोयता आणि काठ्या घेऊन हवेत फिरवत मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest