Crime News : येण्या-जाण्याचा रस्ता बंद करून महिलेला दिली जिवे मारण्याची धमकी

तारेचे कंपाउंड तोडून तेथे गेट लावून येण्या जाण्याचा रस्ता बंद केला. तसेच महिलेला आणि तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : येण्या-जाण्याचा रस्ता बंद करून महिलेला दिली जिवे मारण्याची धमकी

संग्रहित छायाचित्र

तारेचे कंपाउंड तोडून तेथे गेट लावून येण्या जाण्याचा रस्ता बंद केला. तसेच महिलेला आणि तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ ते ६ डिसेंबर या कालावधीत वाकड येथे घडली आहे.

महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी सुरेश हरिभाऊ भुजबळ, मयुर सुरेश भुजबळ, चार महिला आरोपी, तेजल मयुर भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तारेचे कंपाऊंड तोडून तेथे आरोपीने गेट लावून फिर्यादी यांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद केला. तसेच हातात कुऱ्हाड घेवून फिर्यादीच्या अंगणातील पाच अंब्याची झाडे तोडली. तसेच शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest