बिबवेवाडीतून हरवलेल्या तीन मुली कल्याणमधील आंबिवलीत मिळाल्या

बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तीन शाळकरी मुलींचा शाेध पोलिसांच्या तत्परतेमुळे लागला. मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. मुली कल्याणमधील आंबिवली भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 6 Sep 2024
  • 03:34 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पोलिसांच्या तत्परतेमुळे चिंताग्रस्त पालकांना मिळाला दिलासा

बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेल्या तीन शाळकरी मुलींचा शाेध पोलिसांच्या तत्परतेमुळे लागला. मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. मुली कल्याणमधील आंबिवली भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

बिबवेवाडी भागात या तीन मुली राहायला आहेत. तिघी मैत्रिणी आहेत. २ सप्टेंबर रोजी या शाळकरी मुली किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या व्हीआयटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्या. मुली घरी परतल्या नसल्याने पालक घाबरले. १२ आणि १५ वर्षांच्या या मुली एकाच भागातून बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मुलींची छायाचित्रे सर्व पोलीस ठाण्यांमधील समूहात प्रसारित करण्यात आली. मुलींच्या मित्र-मैत्रिणींकडे चैाकशी करण्यात आली. तांत्रिक तपासात मुली कल्याणमधील आंबिवली परिसरात असल्याची माहिती मिळाली. ठाण्यातील खडकपाडा पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती देण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी मुलींची छायाचित्रे पाठविण्यात आली. पोलिसांनी तिघींना ताब्यात घेतले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. मुलींना ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक पुण्यात पोहोचले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मनोजकुमार लाेंढे, साहाय्यक निरीक्षक विद्या सावंत, उपनिरीक्षक अशोक येवले, विशाल जाधव, प्रतीक करंजे, वर्षा ठोंबरे यांनी ही कामगिरी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest