Pune Crime : मोबाईल व बॅटरी चोरणारे गजाआड

स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) मोबाईल व बॅटरी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या बॅटरी, गुन्हयात वापरलेले वाहन व पुणे शहर परिसरातुन चोरी केलेले एकुण २९ मोबाईल फोन असा ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

Pune Crime

मोबाईल व बॅटरी चोरणारे गजाआड

पुणे : स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) मोबाईल व बॅटरी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या बॅटरी, गुन्हयात वापरलेले वाहन व पुणे शहर परिसरातुन चोरी केलेले एकुण २९ मोबाईल फोन असा ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

ज्ञानेश्वर शशिकांत रामटेके (Dnyaneshwar Shashikant Ramteke)  (वय २१, रा. डॉल्फिन चौक, अप्पर) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीबाबत तपास पथकाचे पोलीस अंमलदार फिरोज शेख, दिपक खंदाड व संदीप घुले यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार जेधे चौकात असलेल्या अंडाभुर्जीचे स्टॉलजवळ सापळा लावण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस अंमलदार फिरोज शेख, दिपक खेंदाड, संदीप घुले यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest