Pune Crime : लग्नात लांबवले साडेबारा लाखांचे दागिने

जळगाववरुन पुण्याला (Pune) लग्नासाठी आलेल्या एका महिलेचे तब्बल १२ लाख ६० हजारांचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस (Bibwewadi Police) ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे : जळगाववरुन पुण्याला (Pune)  लग्नासाठी आलेल्या एका महिलेचे तब्बल १२ लाख ६० हजारांचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस (Bibwewadi Police) ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १२ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत घडला. (Pune Crime News)

याप्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला जळगाववरुन लग्नासाठी पुण्यात आली होती. रेल्वेने प्रवास करून आलेली ही महिला बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे लग्नाकरिता गेली. रेल्वे प्रवासादरम्यान किंवा लग्नस्थळी पर्समधून चोरण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest