Pune Crime : महिलेने पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला मोबाईल

विमानतळ पोलिसांच्या (Vimantal Police)विरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चौकशीच्या अहवालावरुन एका महिलेने थेट अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) यांच्या कार्यालयात गोंधळ घातला.

Pune Crime

महिलेने पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला मोबाईल

पुणे : विमानतळ पोलिसांच्या (Vimantal Police)विरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चौकशीच्या अहवालावरुन एका महिलेने थेट अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma)  यांच्या कार्यालयात गोंधळ घातला. तिला समजावण्यासाठी आलेल्या महिला पोलिसाला झटापट करीत तिच्या डोक्यात मोबाईल मारून जखमी करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. (Pune police)

श्वेता प्रमोद कदम (Shweta Pramod Kadam) (रा. सिद्धार्थ नगर, येरवडा) असे अटक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राखी योगेश खवले (Rakhi Yogesh Khawle) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता कदम यांनी विमानतळ पोलिसांच्या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केलेला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) रंजनकुमार शर्मा यांनी ही चौकशी खडकी विभागाचे संहायक आयुक्त यांच्याकडे देण्यात आली होती. त्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. ही महिला शर्मा यांच्या कार्यालयात आली होती. या अर्जाच्या बाबत तिने विचारणा सुरू केली. त्यावेळी शर्मा तिला समजावून सांगत होते.

त्यावेळी या महिलेने हा अहवाल आपल्या मनाप्रमाणे नसल्याचे सांगत गोंधळ घालायला सुरुवात केली. तिने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी शर्मा यांनी या महिलेला बाहेर जाण्यास सांगितले. फिर्यादी हवालदार खवले या महिलेला समजावून बाहेर काढत होत्या. त्यावेळी चिडलेल्या मोबाईलने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. तसेच, धक्काबुक्की करीत बघून घेण्याची धमकी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest