धक्कादायक... भोसरीत दहा वर्षीय मुलाची आत्‍महत्‍या

पिंपरी चिंचवड: खेळताना लहान भावासोबत झालेल्‍या भांडणानंतर एका दहा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याचा धक्कादायक प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला आहे.

संग्रहित छायाचित्र

भोसरी पोलीस ठाण्‍यात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद

पिंपरी चिंचवड: खेळताना लहान भावासोबत झालेल्‍या भांडणानंतर एका दहा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याचा धक्कादायक प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला आहे. (pimpri chinchwad news)

चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे सोमवारी (दि. ८) दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास ही घटना घडली असून, याबाबत पिंपरी चिंचवड शहरात दुसऱ्या दिवशी ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आहे.

सार्थक संतोष सोनानेे (वय १०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या मुलाचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक याचे आई–वडील दोघेही कामावर गेले होते. त्‍यावेळी घरी सार्थक आणि त्‍याचा लहान भाऊ खेळत होता. खेळताना त्‍यांच्‍यात भांडण झाले. त्‍यानंतर संतापलेल्‍या सार्थक याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. सार्थक याच्‍या लहान भावाने ही बाब शेजारी राहत असलेल्‍यांना सांगितली. शेजारी यांनी सार्थक याला खाली उतरवून त्‍वरीत रुग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टारांनी घोषित केले. याबाबत भोसरी पोलीस ठाण्‍यात आकस्‍मात मृत्‍यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest