Pune Crime : शतपावली पडली महिलेला महागात! चोरट्याने गळ्यातील सोनसाखळी हिसकावली; सराईत गजाआड

शतपावली करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती.

Theft

शतपावली पडली महिलेला महागात! चोरट्याने गळ्यातील सोनसाखळी हिसकावली; सराईत गजाआड

पुणे : शतपावली करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला (Theft) वारजे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. (Pune Crime News) 

सचिन नथु पोळ (Sachin Nathu Pol)  (वय ४०, रा. आदेश अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरुड) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारजे येथील वाराणसी सोसायटीच्या जवळ असलेल्या ॠतुविहार बिल्डींगचे गेटसमोरून  काळ्या रंगाची दुचाकीवरुन आलेल्या पोळ याने या महिलेच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अर्धवट चैन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने हिसका मारुन चोरून नेली होती. गुन्हा दाखल होताच तपासायला सुरुवात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे यांनी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. आरोपी हा वाराणसी सोसायटी परीसरात एका ठिकाणी खाजगी कॅमेरामध्ये कैद झाल्याचे लक्षात आले. त्याच्या दुचाकीवर श्री स्वामी समर्थांचे स्टिकर होते. 

दरम्यान उत्तमनगर येथील एका कॅमेऱ्यामध्ये तो विना मास्कचा दिसला.  त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, पथकातील अंमलदार प्रदिप शेलार व श्रीकांत भांगरे यांना आरोपी शिंदे पुल येथे थांबल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. याठिकाणी पोलिसांनी सापळा लावत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर  कोथरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यापुर्वी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

 ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी  तथा पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, हनुमंत मासाळ, संतोष नांगरे, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, ज्ञानेश्वर गुजर यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest