पुणे : पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणीवर बलात्कार; बेकायदेशीरपणे घडवला गर्भपात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जुळले प्रेम संबंध

स्पर्धा परीक्षेचा एकत्र अभ्यास करीत असताना तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यासोबत शारिरीक संबंध (physical relationship) प्रस्थापित करून पोलीस उपनिरीक्षकाने (Sub-Inspector of Police) बेकायदा गर्भपात केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे.

Kiran Mahamuni

पुणे : पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणीवर बलात्कार; बेकायदेशीरपणे घडवला गर्भपात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जुळले प्रेम संबंध

पुणे : स्पर्धा परीक्षेचा एकत्र अभ्यास करीत असताना तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यासोबत शारिरीक संबंध (physical relationship) प्रस्थापित करून पोलीस उपनिरीक्षकाने (Sub-Inspector of Police) बेकायदा गर्भपात केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादवि ३७६, ३७७ आणि ३१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ ऑगस्ट २०१७ ते १७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शिवाजीनगर गावठाण व जामखेड याठिकाणी घडला. 

किरण माणिक महामुनी (Kiran Mahamuni) (वय ३३, रा. डी. पी. रस्ता, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३३ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक किरण महामुनी हे सध्या नागपूर शहर याठिकाणी नेमणुकीस आहेत. महामुनी आणि पिडीत महिला एकाच जिल्ह्यातील राहणारे आहेत. साधाराणपणे २०१५-१६ च्या दरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली. शिवाजीनगर गावठाण येथील रेणुका निवासमध्ये महामुनी त्यावेळी रहात होते. याठिकाणी ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असत. तर, पिडीत महिला देखील त्यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती. हे दोघे एकत्रित अभ्यास करायचे. अभ्यास करीत असतानाच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. महामुनी यांनी पीडित मुलीला वारंवार घरी नेले. याठिकाणी तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

दरम्यान, पिडीत तरुणी त्यामुळे गरोदर राहिली. त्याने या तरुणीला २३ जुलै २०१७ रोजी नगर जिल्ह्यातील जामखेड याठिकाणी नाजीरा बानोस हॉस्पिटलमध्ये नेले. त्याठिकाणी तिचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर या दोघांच्या प्रेम संबंधांमध्ये दुरावा आला. या तरुणीसोबत त्याने विवाह करण्यास नकार दिला. याप्रकरणी तरुणीने न्यायालयात बलात्कारप्रकरणी तक्रार दाखल केली. न्यायालयाने पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा प्रकार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावठाणांत घडल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आला. याबाबत वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत म्हणाले, की पिडीत महिलेने न्यायालयात तक्रार दाखल केलेली होती. न्यायालयाच्या आदेशाने कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest