Raigad Accident News: ताम्हिणी घाटात खासगी बस उलटली, दोन महिलांचा मृत्यू

रायगड: ताम्हिणी घाटात आज सकाळी खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याहून ही बस कोकणात येत असताना

Accident News

Raigad Accident News: ताम्हिणी घाटात खासगी बस उलटली, दोन महिलांचा मृत्यू

पर्यटकांना घेवून जात असताना उलटली बस

रायगड:  ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) आज सकाळी खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याहून ही बस कोकणात येत असताना अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातानंतर तातडीने महाड, माणगाव इथून रुग्णवाहिका घटना स्थळाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 55 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Raigad Accident News)

पुण्याहून कोकणात येत असताना ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस उलटली आहे. या अपघातात बसमधील दोन प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर काही प्रवासी जखमी असून काही प्रवासी बसमध्येच अडकले आहेत. ही बस पुण्याहून हरीहरेश्र्वर येथे पर्यटकांना घेवून येत असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. 

जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा वाहतूक सुरळीत केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest