संग्रहित छायाचित्र
पुणे: चाकण जवळील कडाचीवाडी येथे लोकवस्तीत भटक्या कुत्र्याच्या टोळक्यांनी थेट चिमुकल्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.
कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळच असताना कुत्र्यांच्या टोळक्याने चिमुकल्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याला खाली पाडून कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. यावेळी नातेवाईकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला.
या हल्लाचा अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनीही हैदोस घातला आहे. कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी हि कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत आहे ही चिंतेची बाब असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे